जळगाव काँग्रेसला खिंडार

0

डॉ. राधेश्याम चौधरी भाजपात

जळगाव प्रतिनिधी

जळगाव प्रतिनिधी

शहरातील काँग्रेसचे जुने कार्यकर्ते डॉ. राधेश्याम चौधरी यांनी आज दि. 10 रोजी पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी आ. राजुमामा भोळे, आ. चंदूभाई पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते.
शहरातील स्टेशन रोडस्थित एका हॉटेलमध्ये पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषद आटोपल्यानंतर पक्षप्रवेश होत असल्याचे सांगण्यात येवून पत्रकारांना थांबविण्यात आले. मात्र पक्ष प्रवेश कोणाचा याबाबत गुप्तता पाळण्यात आली. याबाबत सर्वांना उत्सुकता असताना डॉ. राधेश्याम चौधरी यांना पाहून सर्वांना धक्काच बसला. यावेळी बोलताना डॉ. चौधरी बोलताना म्हणाले की, विरोधात असताना अनेकानेक आंदोलने केली. आपण पैशांसाठी राजकारण करत नसून जळगावकरांचे भले करण्यासाठी पंतप्रधान नद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्यावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश करीत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. विधानसभेसाठी जळगाव शहर काँग्रेसच्या हक्काची असलेली जळगावची जागा ही राष्ट्रवादीला सुटल्यामुळे त्यांच्या मनात खदखद होती. त्यांनी बंड पुकारत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यानंतर माघारीच्या दिवशी त्यांनी आश्चर्यजनक माघार घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. जळगावकरांचे भले करण्यासाठी विकासाच्या दिशेने जात असल्याचे सांगून यावेळी त्यांनी भूतकाळाबाबत बोलणे टाळले.

Leave A Reply

Your email address will not be published.