जळगावात ११ रोजी महायुतीचा बूथ प्रमुख मेळावा

0

जळगाव :- लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धार वाढवण्यासाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महत्वपूर्ण बैठक जी.एम.फाउंडेशन येथे पार पडली. यावेळी राजूमामा भोळे यांनी सांगितले की, प्रचार रली, सभा, मेळावा, कॉर्नर सभा होणार असल्याच्या सूचना दिल्या.

जळगावमध्ये बुधवार दि.१० एप्रिलला भाजप-शिवसेना,रिपाई, रासप, शिवसंग्राम महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला असून मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्य सहकार मंत्री गुलाबराव पाटील, माजी महसूल मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, शिवसेनेचे माजी नेते सुरेश दादा जैन तसेच महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. यासाठी मंडळ अध्यक्ष, नगरसेवक, शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुख यांनी आपापल्या प्रभात बैठका घेऊन पेज प्रमुख मेळावा यशस्वी करावयाचा आहे. तसेच मतदानास थोडेच दिवस शिल्लक राहिले असून आपण प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क करावयाचा आहे. दरम्यान जिल्हा संघटन सरचिटणीस पदाधिकारी विशाल त्रिपाठी यांनी आगामी प्रचाराची माहिती सूचित केली. तसेच जळगाव महानगराचे शहराचे विस्तारक नितीन कोळी यांनी पेज प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख यांना माहिती दिली.

या बैठकीला महापौर सीमाताई भोळे, स्थायी सभापती जितेंद्र मराठे, महिला सभापती मंगलाताई चौधरी, गटनेते भगत बालानी, सभागृह नेते ललित कोल्हे, उपगटनेते राजेंद्र पाटील, माजी महापौर सदाशिव ढेकळे, नगरसेवक कैलास सोनवणे, जिल्हा संघ सरचिटणीस पदाधिकारी विशाल त्रिपाठी, माजी नगराध्यक्ष बंडू काळे यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.

Leave A Reply

Your email address will not be published.