भडगाव तहसील कार्यालयात एक खिडकी कक्ष सुरू

0

भडगाव- सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून निवडणुकीसाठी लागणारे विविध परवाने यासाठी भडगाव तहसील कार्यालयात एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आले आहे. यासाठी आता परवाने घेण्यासाठी कार्यकर्त्यांची दमछाक होणार नसून ते सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत उमेदवाराचा व पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागतात . यापूर्वी त्यांना पोलिस स्टेशन, नगरपालिका, पंचायत समिती, आदी शासकीय कार्यालयांमधून विविध प्रकारचे परवाने यात डिजिटल फलक, प्रचार रॅली, रिक्षावरील प्रचार, पोस्टर, स्टिकर, पताका, वाहनांना परवानगी तसेच विविध प्रकारचे निवडणूक काळातील परवाने आता एक खिडकी कक्ष याद्वारे मिळतील. यावेळी निवडणूक नायब तहसिलदार श्री. कोल्हे, पो. कॉ. लक्ष्मण पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.