जळगाव जिल्हा काँग्रेसची दिवाळखोरी जगजाहीर

0

अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्षांचा दुकान भाड्यातून होतोय गुजारा

जळगाव:- जळगाव जिल्हा पूर्ण कांग्रेसमय होता. खासदार, आमदार, जिल्हापरिषद कांग्रेसच्या ताब्यात होती. पण जळगाव जिल्ह्यातील कांग्रेस पुढाऱ्यांनी पेट्रोल पंप,शाळा संस्था, दारुची दुकाने कमी पडली कि काय,आता तर चक्क कांग्रेसभवन भाड्याने दिले असून कांग्रेसभवन समोरची मोकळी जागा कापड दुकानदारांना भाड्याने देऊन अध्यक्ष, सचिव व उपाध्यक्ष हे गुजारा करीत आहेत. याबाबत शहर महिला अध्यक्ष अरुणा पाटील व अनेकांनी आक्षेप घेतला तर त्या महिलेला पक्षातून निलंबित करून कारवाई केल्याचा आरोप आता होत आहे.
म्हणजे भाडे खाऊन पक्ष चालवण्याची पाळी संदिप पाटील व डि जी पाटील यांचेवर आलेली असल्याचे बोलले जात आहे. कांग्रेसची सत्ता आली तर सार्वजनिक व सरकारी इमारती अशा भाड्याने देतील काय? असा संकेत संदिप पाटील व डि जी पाटील यांनी दिलेला आहे.

जळगांव कांग्रेस ही इमारतीच्या भाड्यावर ताव मारते.अशा तक्रारी प्रदेश सचिव श्री ओझा यांचेकडे गेल्यानंतर त्यांनी दि ८ रोजी निरीक्षक मंडळ जळगाव येथे पाठवले. त्याची नोटीस पत्रकारांना होती.कांग्रेस हा जनतेचा पक्ष आहे,आणि कांग्रेसभवन ही सार्वजनिक सेवेची इमारत आहे,असे समजून पत्रकार पोहचले .डी जी पाटील हे कधीही बाहेर जनतेत दिसत नाहीत. धरणगाव येथे गल्लीतील लोक त्यांना ओळखत नाहीत. ते काल कांग्रेसभवनमधे आले.आणि त्यांनी वरील मजल्यावर बसलेल्या पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले. असे काय गौडबंगाल डी जी पाटील करीत होते,कि ते पत्रकारांना आणि जनतेला कळू नये.काही आर्थिक सौदेबाजी कसली तरी इतर वेळी करू शकतात.यामुळे नेत्यांच्या मनात काय चालले आहे हे सामान्य जनतेला समजावे हा हेतू पत्रकारांचा असतो .

काँग्रेस नेत्यांनी ओकली राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत गरळ
एकीकडे आम्ही आघाडीच्या माध्यमातून एकत्र असल्याचा बहाणा काँग्रेस नेते करीत असले तरी परिस्थिती या उलट आहे . काल सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास काँग्रेसची बैठक झाली. त्यात बोलताना डीजी पाटील यांनी सांगितले कि , राष्ट्रवादीचे नेते काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे बोलणे ऐकत नाही अशी सल बैठकीत बोलून दाखविली. मात्र बाहेर हेच काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीच्या उमेदवाराला लीड मिळवून देण्याचे आवाहन करीत असतात. त्यामुळे यांचे दुट्टप्पी धोरण समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.