जळगावात बहुजन क्रांती मोर्चातर्फे धरणे आंदोलन

0

जळगाव : बहुजन क्रांती मोर्चातर्फे नागरिकतत्व व सी.ए.बीच्या विरोधतात राष्ट्रव्यापी धरणे व प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी १२ ते ५ पर्यंत करण्यात आले.यावेळी नागरिकतत्व संशोधन बिल पारित करून धर्माचा आधार घेऊन भेदभाव करण्यात आला आहे हे संविधानाचा मौलिक अधिकाराचा विरोधात आहे त्यामुळे या कायद्यांचा विरोध यावेळी करण्यात आला. तसेच देशातील भाजप सरकार हे लोकशाही व संविधान विरोधी सरकार आहे यासोबतच या कायद्यासाठी भाजपा व्यतिरिक्त काँग्रेस, राष्ट्रवादी असे सर्व पक्षच तितकेच जबाबदार आहे असे ही यावेळी प्रतिभा उबाळे यांनी सांगितले. या सरकारने आणलेले नागरिकता संशोधन विधेयक हे घटनाबाह्य आहे. तसेच ते संयुक्त राष्ट्र संघ आणि आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोग यांच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे. या कायद्यामुळे देशात दुफळी निर्माण होवुन देशाच्या एकतेला बांधा निर्माण करण्याचा प्रयन्त करण्यात आला आहे. त्यामुळेच देशाची एकता व अखंडता टिकविण्यासाठी या विधेयकाला कडाडुन विरोध करण्यात आला. तसेच दि ३ जानेवारी २०२० रोजी ही जिल्ह्याभरात आंदोलन करण्यात येणार आहे तर दि ३० जानेवारीला भारत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी राजू खरे,सुनील देहदे, मोहन शिंदे,डॉ.शाकीर, रईस बागवान, अशफाक पिंजारी , अजमल शाह, हमीद शेख, हारून मन्सुरी, हाफिस फिरोज,विजय सुरवाडे, निळू इंगळे, मुकेश सावकारे, बबलू पेंढारकर, धर्मराज सपकाळे, अकरम देशमुख, राधे शिरसाठ,शालू यादव,विनोद रंधे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.