बोदवडमध्ये किराणा दुकान फोडून २२ हजाराचा मुद्देमाल लंपास

0

बोदवड – शहरातील जामठीरोडवरील ‘ओम साई नाथ’ नामक किराणा दुकान दि.१९ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील २१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी बोदवड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

सदर दुकान सुभाष नवलमल दोधाणी (वय ६५ रा.जैन मंदिरा जवळ प्रभाग क्रं.१० बोदवड ता.बोदवड) यांच्या मालकीचे असून नेहमी प्रमाणे रात्री ८:३० दरम्यान आपण किराणा दुकानाचे व्यवहार आटपून घरी गेलो असता दि.२० रोजी सकाळी ८ वाजे सुमारास दुकान उघडण्यासाठी आलो असता दुकानाची शाळेकडील भिंत फोडून व दुकानाचे पत्रे वाकवून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील ६ हजार रुपये किंमतीच्या गुळाची भेल्या,३ हजार २०० रुपयांचा २० किलोची खोबरं वाटी कट्टा,१२ हजार रुपये किंमतीची किरकोळ सामान त्यात बिडी बंडल,वेलदोडे पाकीट,असा एकूण २१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे लक्षात आले असता त्यांनी पोलिसांत तक्रार दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.