जळगावात आर्थिक नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

0

जळगाव (प्रतिनीधी) : – शहरातील ज्ञानदेव नगर येथील सुनिधी पार्कमधील तरुणाने आर्थिक नैराश्य आल्याकारणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. संतोष पाटील (45) असे या मृत तरुणाचे नाव आहे. आयोध्या नगरमध्ये सोनल टेन्ट हाऊस नावाने टेन्ट हाऊसचा व्यवसाय संतोष पाटील यांचा आहे.

दरम्यान, नवीन घर घेण्याच्या दृष्टीने त्याच परिसरातच राजपूत नामक व्यक्तीशी सात लाख रुपये देऊन व्यवहार केला होता असे समजते. तो व्यवहार फीसकटल्याने अडकलेले पैसे परत मिळत नाही आणि ज्यांच्याकडून हात उसनवारी केली होती त्यां चां सुरू असलेला तगादा या सगळ्या बाबीं मुळे नैराश्य येऊन या तरुणाने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
त्याला दहावीत असलेला एक मुलगा आणि नववीत असलेली एक मुलगी असे दोन अपत्य आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.