जळगावमध्ये राष्ट्रवादीतर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन

0

जळगाव :- लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज  जोरदार शक्तीप्रदर्शन केले. गुलाबराव देवकर आज राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. दरम्यान शिवतीर्थ मैदानावरून आज सकाळी १० वाजेच्या सुमारास राष्ट्रवादीतर्फे गुलाबराव देवकर यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

सभेदरम्यान देवकर म्हणाले की, जळगाव मतदार संघामध्ये गेल्या २० वर्षापासून भाजपाचे खासदार सातत्याने निवडून येत होते आणि त्यांच्या या कालावधीमध्ये मतदारसंघाचा कसा विकास झाला याची माहिती जनतेला जवळून असल्यामुळे जनता मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त करत असल्याचे त्यांनी सागितले. एक सुद्धा विकासाच ठोस काम या २० वर्षामध्ये मतदार संघामध्ये कुठेही बघायला मिळाले नाही. रेल्वे थांब्याच्या पलीकडे या मतदारसंघात एकही विकासाचे काम झाले नाही. म्हणून जनतेन ठरवून टाकले आहे की या मतदार संघातमध्ये अशाच प्रकारचा खासदार असला पाहिजे ज्याच्या मध्ये विकासाची दृस्ठी आहे, जोतळमळ करतो, धरपळ करतो आणि म्हणून मतदारसंघाचा विकास करण्यासाठी देवकर सारख्या उमेदवाराला आपण निवडून दिले पाहिज, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्रभैय्या पाटील, आमदार डॉ. सतीश पाटील, आमदार सुधीर तांबे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. राधेश्याम चौधरीमाजी खासदार ईश्‍वरलाल जैन, गफ्फार मलीक, माजी आमदार दिलीप वाघ, संतोष चौधरी, माजी आमदार राजीव देशमुख, कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, संजय गरूड, नामदेव चौधरी आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सभेदरम्यान विविध पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.