कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीसाच्या तोंडाला फासले काळे

0

जळगाव :- पक्षांतर्गत वादातून कॉंग्रेस भवनमध्ये कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील यांच्यावर १० ते १२ जणांनी हल्ला करत त्यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेमुळे काही वेळ फुले मार्केट परिसरात प्रचंड घबराहटीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, महिला शहरध्यक्षांचा पदभार काढल्याच्या प्रकरणातून हा हल्ला करण्यात आला.

काही दिवसापूर्वी जिल्हाध्यक्ष यांच्या विरोधात काँग्रेस महिला शहराध्यक्ष अरुणा पाटील यांनी भीक मांगो अंदोलन केले होते. त्यामुळे पक्षांतर्गत कार्यवाही करून त्यांचा पदभार काढण्यात आले होते. त्याचा राग आल्यामुळे आज सकाळी ११ वाजता अरुणा पाटील यांनी जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील यांच्यावर शाई फेकून आठ दहा तरुणांनी मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील,माजी खासदार उल्हास पाटील, राधेशाम तिवारी,माजी आमदार सुधीर तांबे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस स्थानक गाठत पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांची भेट घेत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.