जळगावकरांनो सावधान : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, आज ९६ रुग्णांची नोंद

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यात नियंत्रणात येत असलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. दिवाळीनंतर अपेक्षेप्रमाणे कोरोनाचा संसर्ग वाढत असून नव्या बाधितांची संख्या बरे होणाऱ्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसत आहे. आज जिल्ह्यात ९६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ॲक्टिव रुग्णांसोबतच गंभीर रुग्णसंख्याही वाढत चालली आहे.  तीन-चार दिवसांपासून बरे होणारे कमी व नवे बाधित जास्त अशी स्थिती आजही कायम होती. आज ९६ बाधित रुग्ण आढळून आले आहे तर ४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

जिल्ह्यात बाधित रुग्णांचा एकूण आकडा ५४ हजार ३३० वर गेला आहे. तर  बरे होणार्या रुग्णांची संख्या ५२ हजार ५२५ वर पोचली आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७.६७ टक्क्यांच्या टप्प्यात आहे. दरम्यान, ५१४ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव शडर २३, जळगाव ग्रामीण ०३, भुसावळ २९, अमळनेर १, चोपडा ७, पाचोरा ३, भडगाव ०२, धरणगाव ००,  यावल ०४, एरंडोल ००, जामनेर ९, रावेर ३, पारोळा २, चाळीसगाव ०२, मुक्ताईनगर ०१, बोदवड ००, अन्य जिल्ह्यातील ७.

Leave A Reply

Your email address will not be published.