जलसंपदामंत्रीपद असूनसुद्धा सिंचनप्रश्नी जिल्हाचा अनुशेष वाढला

0

बहुमतात असूनसुद्धा दिलेल्या आश्वासनांची पुर्तता नसेल तर सत्ताधार्‍यांना मते मागण्याचा अधिकारच नाही- माजी मंत्री देवकर

जळगांव –
जिल्ह्याचे आमदार जलसंपदामंत्रीपदी असून मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मानले जातात. त्यामुळे राज्यच नव्हेतर देशपातळीवरचे अनेक प्रश्न ना. महाजनांनी सोडविले. तसेच केंद्र, राज्यच नव्हेतर गेल्या 7/8 महिन्यांपूर्वीच मनपात देखिल भाजप बहुमतात आहे. जलसंपदामंत्री ना. महाजनांची जिल्हयाविषयी अनास्था असल्यानेच पाडळसे, गिरणा, शेळगांव बॅरेजसह अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत.त्यामुळे जिल्ह्याचा सिंचनाला मोठा अनुशेष असून जनतेला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता होत नसेल तर सत्ताधार्‍यानां मते मागण्याचा अधिकारच नाही असे परखड मत माजी मंत्री तथा लोकसभेचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी लोकलाईव्हच्या मुलाखतीत व्यक्त केले.
तत्कालीन आघाडी शासनाच्या काळात जिल्हयाचा पालकमंत्रीपदासह 9 खात्यांचा मंत्रीपदाचा कारभार पहात होतो. हात दाखवा मंत्री थांबवा असे ब्रीदवाक्य कार्यकत्यार्ंच्या माध्यमातुन राबविले होते. मजुर सोसायटी, जिल्हा बँक, मनपा आदी माध्यमातुन सर्वसामान्यांची लोकाभिमुख कामांना प्राधान्य दिले आहे. लोकसभेच्या निवडणूका जाहिर होण्यापुर्वीच 15 दिवस आधीच राज्यातुनच नव्हेतर देशभरातुन सर्वप्रथम जळगांवसाठी गुलाबराव देवकरांची उमेदवारी जाहिर होणे हि कोणतीही खेळी नाही. केवळ अनेक वर्षापासून सातत्याने जनसंपर्क,जनहिताची कामे यातुन माझी आणि माझ्या पक्षाची प्रतिमा तयार झाली होती. त्यामाध्यमातुन तळागाळातुन रा.कॉ.तर्फे सर्वेक्षण करण्यात येवून पक्षाध्यक्ष शरद पवार यांना माझ्या व्यक्तिमत्वाविषयी माहिती होती, याची जाणीव ठेवूनच चाळीसगांव येथे एका लग्नसमारंभात असतानाच पक्षाध्यक्ष पवार यांनी व्यक्तीगत फोनवर संपर्क करून कोठे आहात, लग्नाच्या ठिकाणी आहे असे सांगताच दुसर्‍या लग्नाची तयारी करा असे लोकसभेच्या उमेदवारीसाठी सांगीतले. मनातुन खात्री होती, पक्षाच्या दृष्टिने हि निवडणूक महत्वाची आहे, अ‍ॅड. वसंतराव मोरे यांच्या दिड वर्षाच्या कालावधी व्यतिरिक्त गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने भाजपाचेचे खासदार निवडून येत आहेत, त्यास निश्चितच छेद दिला जाणार आहे असा विश्वास देवकर यांनी व्यक्त केला.
1988 मधे मजुर सोसायटी स्थापन करून त्यामाध्यमातुन अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांन रोजगार संधी मिळवून दिली, जिल्हा बँक व्हाईस चेअरमन असतांना एनपीए, वसुली मेळावे, आदी ठिकाणी सहकाराच्या माध्यमातुन ग्रामीण भागापर्यत पक्षाची विचारधारा सर्वसामान्यापर्यत पोचवली.
2009 मधे प्रथमच जळगांव ग्रामीण मधून विधानसभेची निवडणूक लढवून सेनेचे उपनेते, परखड बुलंद तोफ असे व्यक्तिमत्व असलेले आ. गुलाबराव पाटील यांचा पराभव नवख्या उमेदवाराने केला.नवनिर्वाचीत आमदारांची ओळख करून घेत असतांनाच पक्षाध्यक्ष पवार यांनी पालकमंत्री आणि जिल्ह्याची जबाबदारी देत असल्याचे सांगीतले, त्यावेळी स्वतःवर विश्वास बसत नव्हता, पालकमंत्री पदावर असतांना दर पंधरा दिवसात जनता दरबाराची संकल्पना राबवून सर्वसामांन्यांच्या समस्यांविषयी माहिती घेवून संबंधित आधिकार्‍यांकडून निराकरण सुद्धा करून घेतले. हे उपक्रम कोणत्याही लोकप्रतिनिधीने राबविलेले नाहीत.
गिरणा नदी पात्र हे बलुन बंधार्‍यासाठी योग्य नसून त्याऐवजी कोल्हापूर बंधारे हि संकल्पना मांडली होती. परंतु अधिकार्‍यांना सांगून नैसर्गीक स्त्रोतांमधून नदीपात्रातील निर्मीती बंधार्‍यात पाणी अडवता येवू शकते असे स्पष्ट केल्यानंतर के.टी. वेअर मंजुर करण्यात आले होते. त्यामानाने जिल्हयाला जलसंपदामंत्री पद मिळून सुंद्धा ना. महाजन यांना अनास्था असल्याने शेळगांव बॅरेज, पाडळसे, वा आदी सिंचनाचा अनुशेष मोठया प्रमाणात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.