जम्मू बस स्थानक स्फोटाने हादरला

0

जम्मू :- पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण असतानाच जम्मूमधील बस स्थानकावर आज १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात 28 जण जखमी झाले आहे. एका व्यक्तीने बसमध्ये ग्रेनेड फेकल्यामुळे हा स्फोट झाला असल्याचे समजते. स्फोटातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी परिसर पूर्णपणे सील केला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चोख सुरक्षा व्यवस्था असतानाही स्फोट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हल्ल्याचं नेमकं कारण तसंच कोणाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता याचा शोध घेतला जात आहे.

जम्मूचे पोलीस महानिरीक्षक एम. के. सिन्हा यांनी हल्ल्याच्या घटनेला दुजारो दिला आहे. जम्मू बसस्थानक हे गर्दीने गजबजलेले असल्याने हा हल्ला झाला आहे. मात्र हल्ला झाला तेव्हा सुदैवाने प्रवाशांची गर्दी नव्हती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या हा पहिला दहशतवादी हल्ला असून यामध्ये 18 जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर सील केला.

Leave A Reply

Your email address will not be published.