पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्याने डबे मागे सोडून इंजिन पुढे धावले

0

मुंबई :- कल्याणजवळ मनमाड-पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्याने एक्स्प्रेसचे इंजिन तीन ते चार डबे घेऊन पुढे गेली धावल्याची घटना गुरुवारी सकाळी कल्याणमधील पत्री पुलाजवळ घडली. कपलिंग तुटले तेव्हा गाडीला मोठा झटका बसल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. दरम्यान, रेल्वेचे डबे आहेत त्याच जागी असून परिस्थितीत काहीही सुधारणा झालेली नसल्याचे समजते. या बिघाडामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद मार्गावरील लोकल गाड्यांचा खोळंबा झाला आहे.

गुरुवारी सकाळी मनमाडवरुन मुंबईला येणारी पंचवटी एक्स्प्रेस कल्याण स्थानकातून ठाण्याच्या दिशेने निघाली. कल्याण स्थानक सोडल्यानंतर पत्री पुलाजवळ पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटले आणि तीन डब्यांसह इंजिन काही अंतर पुढे गेले. तर उर्वरित डबे मागेच राहिले. या प्रकाराने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली असून सकाळी गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.