जप्त वाहनेबाबत चाळीसगाव शहर पोलीसांचे आवाहन

0

चाळीसगाव | प्रतिनिधी
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विजय कुमार ठाकुरवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर निवेदन दिले की, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे हद्दीतील गेले १० वर्षांपासून चोरी, अपघातात व बेवारस अशी वाहने, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला जप्त आहेत, या वाहनांचे नंबर प्लेट, इंजिन नंबर,चेसिस नंबर, अशी नोटीस बोर्डावर चिटकण्यात आली आहे, ज्या नागरीकांची ही वाहने असतील त्यांनी वाहनांची मुळ कागदपत्रे सह खात्री करून घेवून जावी , तसेच दहा दिवसांत जर कोणी नागरिक, वाहनांची मुळ कागदपत्रे सह ओळख पटवून न नेल्यास त्या वाहनांचा शासकीय नियमानुसार लिलाव करण्यात येईल,व ती लिलावाची रक्कम सरकार जमा करण्यात येईल, असे नोटीसद्वारे जाहीर करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.