छावा मराठा युवा महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी मंगलाताई सोनवणे

0

जळगाव :- जळगाव जिल्ह्यात निर्भीड महिला सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौटुंबिक समुपदेशक, इंदुबाई महिला बहुद्देशीय मंडळ व रणरागिणी ग्रुप च्या संस्थापक अध्यक्षा ,महिला दक्षता समिती सदस्या मंगलाताई सोनवणे यांची “छावा मराठा युवा महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी” नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे व मंगलाताईंनी वाल्मिक नगर भागात अवैधरित्या होणाऱ्या दारू निर्मिती व विक्री विरोधात यशस्वी आंदोलन केले आहे . गणेशोत्सवादरम्यान व इतरही वेळी रणरागिणी ग्रूप च्या महिला बंदोबस्त कामी पोलिसांना मदत करीत असतात. यासह अनेक समाज उपयोगी कार्य व अन्यायाला प्रतिकार त्या करतात. सदर नियुक्ती बद्दल महासंघाचे संस्थापक धनाजी येळकर पाटील यांनी अभिनंदन केले आहे. नियुक्ती करतांना महानगराध्यक्ष प्रशांत फाळके , विद्यार्थी आघाडीचे उ.म. अध्यक्ष अजय पाटील ,राजकिरण चौधरी , जाधव साहेब व ताईंच्या सहकारी महिला मंडळाच्या भगिनी उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.