भुसावळ विभागात विविध कामांसाठी ५५० कोटींची तरतूद – विवेक कुमार गुप्ता

0

भुसावळ  :- केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात भुसावळ विभागातील विविध कामांसाठी ५५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून निधी येताच ती सर्व कामे जलद गतीने पूर्णत्वास नेण्यात येतील असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनी सांगितले. ते आज दि.११जुलै रोजी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज सिन्हा,वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर.के. शर्मा उपस्थित होते.

यावेळी विवेककुमार गुप्ता म्हणाले की,पाचोरा-जामनेर नॅरोगेज मार्गाला ब्रॉडगेज करून मलकापूरपर्यंत विस्तार करण्यात येणार असून रेल्वे बोर्डाची त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही.सन २०२२ पर्यंत सर्व लेव्हल क्रॉसिंग बंद करण्यात येणार असून यासाठी ५५ कोटी व नवीन कामांसाठी ४७ कोटींची तरतूद आहे.लोहमार्ग नवीनी करणासाठी ९७ कोटी तर नवीन लोहमार्गासाठी ९१ कोटी रुपये लिफ्ट, एस्केलेटर्स ,वाय-फाय, वातानुकूलित प्रतीक्षालय, पादचारी पूल ,उच्च क्षमतेचे फलाट व शौचालय सुधार आदी जुन्या व नवीन कामांसाठी ८८९ कोटींची तरतूद आहे.पाचोरा जामनेर नॅरोगेजचे ब्रॉडगेज मध्ये परिवर्तना सोबत मलकापुर पर्यन्त विस्तार ८४ किलोमीटर साठी १ करोड रूपयांची तरतूद करण्यात आली असून आता या कार्याकरीता रेल्वे बोर्डा कडून मान्यता मिळणे बाकी आहे तर 2022 पर्यंत सर्व (क्रासिंग गेट) समपार फाटक बंद करण्याला प्राधान्यक्रम देण्यात आलेला असून यासाठी भुसावळ विभागातील यामध्ये जुन्या कार्याकरीता 55 करोड रुपये तर नविन कार्यकारिता ४७ करोड रुपयांची तरतूद करण्यार्त आली आहे . विभागातील रेल्वे मार्गाच्या नवीनीकरणाकरिता तब्बल १८८ करोड रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातील ९७ करोड रुपये ट्रक नवीनीकरणाच्या जुन्या कार्यासाठी तर ९१ करोड रुपये ट्रक नविनीकरणाच्या नव्या कार्यासाठी मंजूर करण्यात आले आहे . प्रवासी सुविधांमध्ये सुधार करण्याच्या दृष्टीने लिफ्ट, (एस्केलेटर) सरकते जिने ,वायफाय सुविधा सीसी टीव्ही , वातानुकूलित प्रतिक्षालय , पादचारी पूल , हायलेव्हल प्लॅटफॉर्म व शौचालय सुविधा आदींसाठी ९१७ करोड रुपयांची तरतूद करण्यात आली आहे . यात २४ लिफ्ट, ८ सरकते जिने, २२ स्थानकांवर वायफाय , तर १२ स्थानकांवर सिसिटीव्ही , १५ ठिकाणी एलइडी लाईट बसविणेव हायमास्ट टॉवर उभा करणे , तर ४० स्थानकांवर आधुनिक पद्धतीने शौचालय तर आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा , भुसावळ, अकोला, नाशिक या ठिकाणी वातानुकूलित प्रतिक्षालय , यासह गाडी दर्शक व दर्शनीय फलक लावण्यात येणार आहे . यासाठी राखीव करण्यात आलेल्या ९१७ करोड निधी पैकी जुन्या कार्यासाठी जवळपास ८८९कोटी रुपये तर नवीन कार्यासाठी २८ कोटी रुपयांची तरतूद आहे .

विभागातील सर्व महत्वपूर्ण स्थानकावर स्वच्छतेच्या देखरेखीसाठी सीसीटीव्हीचा वापर करून देखरेख करण्‍यात येईल. प्लॅस्टिक बाटल्यांचा अनधिकृत वापर थांबविण्यात येणार आहे.भुसावळ विभागात १०० टक्के विद्युतीकरण झाले आहे.पॅसेंजर गाडी ऐवजी सर्व सुविधायुक्त मेमु गाडी चालविण्यात येणार असून त्याची सुरुवात भुसावळ -अमरावती मार्गे नरखेड दरम्यान करण्यात येणार आहे. या मेमू गाडीला १६ डबे असतील. .भुसावळ-जळगाव दरम्यान चौथ्या मार्गाचे काम सुद्धा लवकरच सुरू होईल व जळगाव- मनमाड तिसऱ्या मार्गाचे काम सुद्धा लवकर मार्गी लावण्यात येईल. राज्य सरकारच्या सर्व परवानग्या घेऊन लेव्हल क्रॉसिंगवर( गोल्डन कॉड्रीलॅटरल ) सुवर्ण चतुष्कोण ची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचेही डिआरएम गुप्ता यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.