छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांचा हल्ला,६ बॉम्बस्फोट

0

छत्तीसगड

निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला फक्त एक दिवस उरला असताना कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. या हल्ल्यात एकामागोमाग एक असे ६ बॉम्छत्तीसगडमधील निवडणुकांना नक्षलवाद्यांचा प्रचंड विरोध होतो आहे. निवडणुकांदरम्यान नक्षलवादी घातपात घडवण्याचीही शक्यता आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा चोख ठेवण्यात आली आहे. बीएसएफचं एक पथक आज सकाळी रेकी करण्यासाठी गेलं असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. आयईडी तंत्राचा वापर करून एकामागोमाग एक बॉम्बस्फोट घडवून आणले. या हल्ल्यात अनेक सुरक्षाकर्मी जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त मिळते आहेत. नक्षलवाद्यांनी काही दिवसापूर्वी दुरदर्शनच्या एका कॅमेरामॅनचीही हत्या केली होती. त्यानंतर रोजच नक्षलवादी आणि जवानांमध्ये राज्यभर चकमक होते आहे. बीजापूर परिसरातही काल एक जवान ठार झाल्याची घटना ताजी आहे. गेल्या आठवड्यात सुरक्षा दलांनी तब्बल ३०० आयईडी बॉम्ब जप्त केले आहे, छत्तीसगडची निवडणूक सुरळीतपणे पार पाडणे हे लष्करासमोरचं आव्हान आहे.
बस्फोट नक्षलवाद्यांनी केल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.