चिंताजनक ! जिल्ह्यातील कोरोना बाधिताचा आकडा १३ हजार पार

0

जळगाव : जिह्यातील कोरोनाचा उद्रेक सुरूच असून आज दिवसभरात ३२१ रूग्ण आढळून आले. त्यात सर्वाधिक ७९ रूग्ण जळगाव शहरात आढळून आले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३२९९ वर पोहचला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १३ हजार ८७ इतकी झाली आहे.

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर ७९, जळगाव ग्रामीण १२, भुसावळ १९, अमळनेर १५, चोपडा २०, पाचोरा १८, यावल ०९, धरणगाव १८, एरंडोल ५१, जामनेर १५, रावेर ०६, पारोळा ०३, चाळीसगाव १८, मुक्ताईनगर ३६. बोदवड ०१, अन्य जिल्हा ०१.

दरम्यान, आज दिवसभरात २०० रूग्ण बरे झाले असून एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ९ हजार १४५ वर गेली आहे. तर आज ०८ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात चाळीसगाव, धरणगाव तालुक्यातील प्रत्येकी २ तर जळगाव, रावेर, पाचोरा आणि एरंडोल तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.