चाळीसगाव येथील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे प्रशासनाविरोधात प्रतीकात्मक आंदोलन

0

चाळीसगाव, प्रतिनिधी 

चाळीसगाव शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमूळे नगरपालिका प्रशासनाविरोधात तहसील कचेरी येथे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.  अक्षरशः गेली ४ वर्षांपासून शहरातील रस्त्यावर चालणे देखील मुश्कील झाले आहे.  खरजई नाका ते दयानंद हॉटेलपर्यंत गेल्या वर्षी रस्ता करण्यात आला होता.  परंतु एकाच वर्षात रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे, सिग्नल पॉईंट ते कचेरीपर्यंत सुद्धा चालणे अवघड झाले आहे.  वयस्कर लोकांचे तर फारच हाल होत आहेत.

या  मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रोजच्या अक्सिडेंटच प्रमाण वाढत आहे. नगरपालिका प्रशासनाने तर गेंड्याच्या कातडीचे स्वरूप घेतले आहे.  गेली ४ वर्ष शहरातील नागरीक व व्यापारी हे सहन करीत आहेत, फक्त कागदावरच नगरपालिकेचा कारभार पाहावयास मिळतो आहे आता तरी प्रशासनाला जाग येईल का…?

चाळीसगाव शहरातील रस्ते हे अतिशय खड्डेमय झालेले असतांना सामान्य जनतेला मणक्याचे व पाठीचे त्रास चालू झाले असून महिलांना तर गाडी चालवणे हे अतीशय कठीण झाले आहे.  सिग्नल चौक पासून ते घाट रोड जाण्यासाठी अर्धा तास लागतोय, खड्यामुळे कायम ट्राफिक जाम असते, गणेश रोड कॅप्टन कॉर्नर कचेरी अंधशाळा ते कचेरी ह्या रस्त्यावर चालणे अवघड झाले आहे तरी आज राष्ट्रवादी कॉग्रेस व लोकनेते अनिलदादा देशमुख शहरविकास आघाडी तर्फ  खड्याभोवती रांगोळी काढून झाडे लावण्यात आली व कचेरी ते सिग्नल व गणेश रोडवर रॅली काढण्यात आली.

यावेळी जि.प. गटनेते शशिकांत साळुंखे, जि.दूधसंघाचे संचालक प्रमोद पाटील, रा.काँ. तालुकाध्यक्ष  दिनेश पाटील, महिला तालुकाध्यक्ष  सोनल साळुंखे, शहराध्यक्ष  श्याम देशमुख, नगरसेवक  भगवान पाटील, पं.स. सभापती अजय पाटील, मंगेश पाटील, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, सदाशिवआप्पा गवळी, जगदीश चौधरी, रवींद्र गिरधर चौधरी, प्रदीप राजपूत, प्रशांत पाटील, शेखर देशमुख, हरीनाना जाधव, बाजीराव दौंड, परिघा आव्हाड, हेमांगी शर्मा, स्नेहल देशमुख, आर के माळीसर, खुशाल पाटील, भैय्यासाहेब पाटील, भाऊसाहेब पाटील, प्रकाश पाटील, योगेश पाटील, मिलिंद शेलार, विजय शितोळे, जिल्हा प्रवक्ते आकाश पाटील, मोहित भोसले तालुकाध्यक्ष  रा.यु.काँग्रेस, शुभम पवार शहराध्यक्ष  रा.यु.काँग्रेस, गौरव पाटील शहराध्यक्ष  रा.वि. काँग्रेस, सुजित पाटील, विलास पाटील, राकेश राखुंडे, आव्हाड सर, दिनेश महाजन, भैय्यासाहेब महाजन, सौरभ त्रिभुवन, रिकी सोनार, गुंजन मोटे, शरदसिंग राजपूत, विनोद गवळी, लेवेश राजपूत, कौस्तुभ राजपूत, पंजाबराव देशमुख, रफिक शेख, सुरज शर्मा, दीपक शिंदे, कुंतेश पाटील, प्रतिक पाटील, विकास बोंडारे, निखील देशमुख, पप्पू राजपूत, मंगेश वाबळे, कुलदीप निकम, हृदय देशमुख, अतुल चौधरी, शुभम गवळे, घनश्याम जगताप, सिद्धार्थ देशमुख आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.