चाळीसगाव पं.स.वर राष्ट्रवादीचा झेंडा, सभापतीपदी अजय पाटील

0

उपसभापती पदी सुनील पाटील

चाळीसगाव :- (प्रतिनिधी) चाळीसगाव पंचायत समितीच्या झालेल्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकीत खासदार उन्मेश पाटील गटाचा पंचायत समिती सदस्य सुनील साहेबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजय पाटील या  उमेदवारास मदत केल्याने राष्ट्रवादी पक्षाचे सभापती पदाचे उमेदवार अजय भाऊसाहेब पाटील हे निवडून आलेत तर उपसभापतीपदी भाजपचेच परंतु राष्ट्रवादी पक्षाच्या गटाला जाऊन मिळालेले सुनील साहेबराव पाटील उपसभापती पदी निवडून आले .

चाळीसगाव पंचायत समितीमध्ये एकूण 14 सदस्य आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस चे ७ व भा ज पा चे ७ असे बलाबल आहे. या झालेल्या निवडणुकीत सभापती म्हणून अजय भाऊसाहेब पाटील यांना आठ मते  तर भारतीय जनता पक्षाचे  उमेदवार माजी उपसभापती संजय भास्कर पाटील यांना सहा मते मिळाली. तसेच उपसभापती साठी 3 तीन अर्ज दाखल केले होते ते असे प्रीती चकोर राष्ट्रवादी सुनंदा सुरेश साळुंखे भाजपा व सुनील साहेबराव पाटील त्यात राष्ट्रवादी पक्षाच्या प्रीती चकोर यांनी माघार घेतल्यानंतर उपसभापती पदासाठी दोनच अर्ज शिल्लक राहिली त्यात उपसभापती सुनील साहेबराव पाटील यांना आठ मते मिळाली तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सुनंदा सुरेश साळुंखे यांना सहा मते मिळालीत

या निवडणुकीचे पीठासन अधिकारी म्हणून चाळीसगाव तहसीलदार श्री अमोल मोरे यांनी काम पाहिले तर त्यांना साहाय्य गटविकास अधिकारी अतुल पाटील तसेच मनोहर गांगुर्डे, एस व्ही पाटील ,जोंधळे साहेब यांनी सहकार्य केले,

Leave A Reply

Your email address will not be published.