चाळीसगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

0

चाळीसगाव नदीपात्रात पोहायला गेलेल्या दोन शाळकळी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना चाळीसगाव तालुक्यात काल घडल्या असून यातील एका घटनेत तिसरीत शिकणारा आठ वर्षीय आणि बारावीत शिकणारा एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील वरखेडे येथे गिरणा नदीत मित्रांबरोबर पोहण्यास गेलेल्या आठ वर्षीय यश राजेंद्र पवार हा मंगळवारी 28 रोजी सकाळी  गेला असता यशला पाण्याचा अंदाज न आल्याने तो प्रवाहात वाहून गेला. तसेच अन्य एक जण वाहून जात असताना त्याला पकडल्यामुळे तो वाचला. नदीवर कपडे धुण्यास आलेल्या एका महिलेने गावात ही माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेत शोध घेतला .एक किलोमीटर वरखेडे खुर्द शिवारात आढळून आला. यामुळे गावात शोककळा पसरली आहे. दुसऱ्या घटनेत पिलखोड तामसवाडी परिसरातील गिरणा नदी त पात्रात पोहायला गेलेल्या बारावीतील मुलगा ओम पाटील व 17 हा पाण्यात बुडून बेपत्ता झाला तर इतर दोघांना वाचवण्यात यश आले आहे गावातील लोकांनी तसेच प्रशासनातर्फे बेपत्ता मुलाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते रात्री उशिरापर्यंत मुलाचा शोध लागला नसून सकाळी पुन्हा पाण्यात बुडलेल्या मुलांची शोध कार्य सुरू होणार आहे. दरम्यान नदीत बुडालेल्या मुलाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.