चाळीसगावात सलून पार्लरवर गुन्हा दाखल

0


चाळीसगाव | प्रतिनिधी

आज चाळीसगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कैलास गावडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, उपविभागीय कार्यालयाचे पोलीस अंमलदार अमोल कुमावत व दिनेश पाटील तसेच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार भटु पाटील, शरद पाटील, महेश बागुल या पथकाने चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीतील घाट रोड वरील दिपक हेअर पार्लर येथे सलून दुकान हे जीवनावश्यक वस्तूंची आस्थापना नसताना देखील खुले ठेवून त्यात सलून चे दुकानात 5 इसम मिळून आले म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर चाळीसगाव पोलीस स्टेशनला संचारबंदी, जमावबंदी , जीवनावश्यक वस्तू नसताना हेअर पार्लर उघडे ठेवून , वापर करणे व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींची नावे- 1) दीपक प्रल्हाद शिंदे, वय- 51 वर्षे , राहणार – शास्त्री नगर, चाळीसगाव. 2) प्रद्युम दीपक शिंदे वय- 21 वर्षे , राहणार- शास्त्रीनगर, चाळीसगाव ३) कैलास बाबूलाल येवला वय- 47वर्षे , राहणार- महादेव आश्रम लौंज जवळ, चाळीसगाव 4) सौरभ आनंदा कोळी, वय- 22 वर्षे, राहणार- घाट रोड, चाळीसगाव 5) अजय नीलकंठ गुरव, वय-26 वर्षे,राहणार- सुवर्णाताई नगर, चालीसगाव. चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या वतीने घराबाहेर विनाकारण बाहेर न पडण्याचे व जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना वगळता इतर दुकाने खुली न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.