डांभुर्णी येथे 16 वर्षीय मुलाचा खुन

0
     यावल  -. एका 16 वर्षीय मुलाच्या डोळ्यात कोणीतरी अज्ञात इसमाने काड्या खुपसून तसेच डोक्यावर जड वस्तू मारून खून केल्याची घटना डांभुर्णी परिसरात घडल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती कळताच यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी रवाना झाले पुढील चौकशी पंचनामा सुरू असल्याची माहिती मिळाली
         डांभुर्णी येथील कैलास चंद्रकांत कोळी वय 16 हा तरुण मुलगा काल दिनांक 2 पासून घरातून तसेच गावातून बेपत्ता झालेला होता त्याचा शोध सुरू असताना आज दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास कोणालातरी तो डांभुर्णी शिवारातील दत्तात्रय माणिकराव पाटील यांच्या शेतात मयत स्थितीत आढळून आल्याची माहिती मिळाली ग्रामस्थ घटनास्थळी गेल्यानंतर मयताच्या डोळ्यात काळया खुपसून तसेच डोक्यावर काहीतरी जड वस्तू मारून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, यावल पोलिसांना घटनेचे वृत्त कळताच यावं पोलीस निरीक्षक अरुण धनवडे आपल्या पोलिस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले  पंचनामा करण्यात असून पुढील तपास यावल पोलिस करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.