धर्मवेडेपणा, अज्ञान, अंधश्रद्धा आणि करोना महामारी …*

0
जळगाव, विशेष प्रतिनिधी – धर्माधता किंवा धर्मवेडेपणा मग तो कोणत्याही धर्माचा असो देशाला आणि समाजाला तो किती घातक आहे हे नुकत्याच देशात घडलेल्या काही ताज्या घटनांवरून दिसून येते. घडलेल्या ह्या घटना आपण रोज वाचतो, टी. व्ही वर बघतो आहोत. यातून कोरोना सारख्या महामारीचा संसर्ग वाढल्याची सूचना आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
प्रगत म्हणून घेणाऱ्या प्रत्येकाने आपण खरच प्रगत झालो आहोत का? याची उलटतपासणी करायची वेळ ही आहे. करोना महामारीच्या प्रादुर्भावाशी लढताना, प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात असताना  देशात घडलेल्या काही अप्रिय घटना बघून काही मंडळी अजूनही ह्याबाबतीत किती उदासीन आहेत हे अधोरेखित झाले आहे.
जडत्व ही विज्ञानातील संकल्पना मानवी विचारांना आणि वर्तनालाही लागु होते. सर्व धर्मातील कालबाह्य तत्वे काढून नवीन मानवतावादी तत्वे रुजविण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या परीने हे जडत्व दूर करण्याचा कशोशीने प्रयत्न केला आहे. ह्यासंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेले विचार आठवतात. ते म्हणाले            होते ,” देशातील लोक आपल्या धर्म जाती पेक्षा देश श्रेष्ठ मनातील कि देशापेक्षा जात धर्म श्रेष्ठ मानतील हे मला माहिती नाही, परंतु लोकांनी आपली मतप्रणाली देशापेक्षा मौल्यवान मानली तर हा देश नष्ट होण्याच्या मार्गावर जाईल. म्हणून आपल्या रक्तातील शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपल्या देशाचे संरक्षण करूया”. या शब्दात बाबासाहेबानी धर्माची चिकित्सा करून राष्ट्रप्रेम जागविले होते.
आजच्या कोरोना महामारीच्या संकटात राष्ट्रापेक्षा धर्माला महत्व देण्यात येत आहे हे देशासाठी भयसूचकच आहे, परिस्थिती विदारक होताना दिसते आहे. खरं तर जातपात, समाजातील काही जाचक रूढी परंपरा ह्यांना तिलांजली देण्याची गरज ह्या परिस्थितीत देशाला आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येकाने थोडे सहिष्णु होऊन स्वतःची बौद्धिक उन्नती सध्या करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
करोना महामारीचे आव्हान विज्ञान विवेकवाद जोपासून परतवून लावले नाही तर कोणताही धर्म खतरेमे नव्हे तर मानवता खतरेमे टाकणारे ठरेल. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी खबरदारीचे नियम पाळणे व शिस्त बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा ती आत्महत्या ठरेल आणि आत्महत्या कोणत्याच धर्मात मान्य नाही. बेजवाबदार वर्तनामुळे अन्य निष्पापांना जीव गमवावा लागणे हेसुद्धा कोणत्याच धर्माला मान्य नाही. त्यामुळे करोना सारख्या साथीचे गांभीर्य झुगारून संपूर्ण देशालाच वेठीस धरणाऱ्या लोकांना थोपवणे ही आजची खरं तर गरज आहे.
संदर्भ: इंटरनेट

Leave A Reply

Your email address will not be published.