चालकाची वरिष्ठ लिपीकास मारहाण तर आगार प्रमुखास शिवीगाळ; गुन्हा दाखल

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

त्रयस्थ कर्मचारी गोपनिय अहवालाची मागणी करत पाचोरा आगारातील वरिष्ठ लिपीकास चालकाकडून मारहाण व आगार प्रमुख यांना शिवीगाळ झाल्याची घटना घडली असुन याबाबत पाचोरा पोलिसात चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा आगारातील चालक प्रदीप अंकुश पाटील रा. पाचोरा हे दि. २७ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आगारात येवुन, यावेळी कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक रविंद्र पाटील यांच्याकडे त्रयस्थ कर्मचाऱ्यांचे समरी व अपराध प्रकरणांचे गोपनिय अहवाल दाखला असे म्हटले असता रविंद्र पाटील यांनी सांगितले की, त्रयस्थ कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल आगार प्रमुखांच्या परवानगी विना देता येत नाही, तुम्हाला त्रयस्थ कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल पाहिजे असल्यास तुम्ही आगार प्रमुखांकडे मागणी करावी असे सांगितले. याचा राग आल्याने प्रदीप पाटील यांनी आगार प्रमुख निलीमा बागुल यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत वरिष्ठ लिपिक रविंद्र पाटील यांच्या हातात असलेला अहवाल हिसकावण्याचा प्रयत्न करून रविंद्र पाटील यांना खाली पाडुन लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.

यावेळी सहाय्यक वाहतुक अधिक्षक सागर फिरके, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक योगेश जाधव व वाहतूक नियंत्रक बाळासाहेब शेळके हे त्यांना समजविण्यासाठी गेले असता प्रदीप पाटील यांनी त्यांना देखील धक्काबुक्की करत आगार प्रमुख निलीमा बागुल यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत होते.

दरम्यान आगार प्रमुख निलीमा बागुल यांची जळगाव येथे कार्यालयीन बैठक असल्याने त्या जळगाव येथे होत्या. घटनेबाबत निलीमा बागुल यांना माहीती दिल्यानंतर त्या तात्काळ घटनास्थळी हजर झाल्यानंतर प्रदिप पाटील यांनी आगार प्रमुखांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करुन घटनास्थळावरुन पळ काढला.
या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात प्रदिप पाटील यांच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक किशोर पाटील हे करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.