चहार्डी ग्रा. पं. कर्मचार्‍यांचे कार्यालयासमोर उपोषण

0

चोपडा, दि 6-
तालेक्यातील चहार्डी येथील ग्रा पं च्या 15 कर्मचारी 20महिन्यांचे थकित पगार व 41महिन्यांच्या प्रा फंड रकमेच्या भरणा विमा 3वर्षे थकित हप्त्यांचा भरणा ग्रा पंने करावा म्हणून 1 मार्च पासून बेमूदत संपावर उतरले आहेत त्या कर्मचारींनी काल रोजी जिल्हा परिषद व जिल्हा धिकारी यांना निवेदन दिले व मागणी केली की कामगार समस्येला जबाबदार ग्रामविकास अधिकारी वर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात याव ग्रा पं बरखास्त करा थकित पगार द्या या गार्हाणं ग्रामस्थांसमोर मांगण्यासाठी चहार्डी ग्रा पं समोर बेमूदत उपोषण सुरू केले आहे .दि 1मार्च रोजीही तहसिलदार अनिल गावित यांना सविस्तर कैफियत मांडली आहे .. उपोषणाला रमेश खैरनार, संजय पाटील, अमर गोयर, मधूकर पाटील, शिला चावरे आदी 13 कर्मचारी सहभागी झाले आहेत. शिवाय कर्मचार्याःचे कूटूंबीय सहभागी झाले आहेत..त्यांनीही निवेदनात म्हटले आहे की, कर्मचारी चे थकित पगार प्रा फंड विमा कपात रक्कम मिलून 20.लाख रू पंचायत कडे कर्मचारी चे घेणे आहे. . अफरातफर प्रकरणी जबाबदार चहार्डी ग्राम पंचायत बरखास्त करावी संबंधित ग्रामविकास अधिकारी यांना बडतर्फ करावे 14 व्या वित्त आयोगाचे रक्कमेतून पगार करावै त्यांचे अनूदान थांबवावे .अशा मागण्या करण्यात आल्या आहेत..

Leave A Reply

Your email address will not be published.