खेळण्यातली सिटी श्वास नलिकेतून काढल्याने कुणालला मिळाले जीवदान

0

पाचोरा (दि.7) –
मुलांचे मनोरंजन करणारी खेळणी काही वेळा जीवघेणी ठरत असल्याचे आपण ऐकत असतो. प्रसंगी अशा खेळण्यातून लहान मुलांच्या जिवावर देखील संकट येत असते. असाच प्रकार पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे या गावांमधील आठ वर्षे वयाच्या कुणाल या बालकाच्या बाबतीत घडला असून प्रसंगी त्याच्यावर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत योग्य उपचार केल्याने एका गरीब कुटुंबातील बालकाला नव्याने जीवदान मिळाले आहे. विशेष म्हणजे आर्थिक क्षमता नसलेल्या कुटुंबातील कुणाल हा एकटाच मुलगा असून त्याला एक लहान बहिण आहे.
याबाबत सविस्तर असेकी येथील कुणाल शिवाजी पाटील या दुसर्‍या वर्गात शिकणार्‍या आठ वर्षीय बालकाने घरी खेळण्यातील शिट्टी वाजवत असताना ती शिट्टी तोंडात ओढली जाऊन थेट श्वासनलिकेत अडकली. हा प्रकार लक्षात येताच त्याचे वडील व शेजारच्या मंडळीने त्याला तात्काळ पाचोरा व तेथून जळगाव येथे उपचारासाठी हलवले. प्रसंगी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून श्वासनलिकेत अडकलेली शिट्टी काढण्याची तयारी करण्यात आली. मात्र शासनाने अडकलेली शेट्टी हृदयाकडे बरीच लांब गेल्याने ऐन वेळेवर शस्त्रक्रिया थांबवण्यात आली. तेथील दवाखान्यात या अवघड शस्त्रक्रियेसाठी सुयोग्य साधन सामुग्री उपलब्ध नसल्याचे लक्षात आल्याने कोणत्याही प्रकारचा धोका न घेता या बालकाला जे जे हॉस्पिटल मुंबई येथे हलवण्याचा सल्ला दिला. या प्रसंगाने भेदरलेल्या कुणालच्या पालकांना मार्ग सुचेनासे झाले होते.
जे जे हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांच्या उपचारांना यश- यानंतर कुणालच्या मदतीला पिंपळगाव गटातील जि. प. सदस्य मधुकर काटे धावून आले त्यांनी आरोग्य दूत रामेश्वर नाईक यांना संपर्क करून कुणालच्या परिस्थितीची माहिती सांगून योग्य उपचारासाठी सहाय्य करण्याची विनंती केली. कुणाल याला जेजे हॉस्पिटल ला हलवण्यात आल्यानंतर तेथील तज्ञ डॉक्टरांनी के.ई.एम. हॉस्पिटलच्या डॉक्टरांची मदत घेत दुर्बिणीच्या सहाय्याने अतिशय अवघड शस्त्रक्रिया सुलभ पद्धतीने पूर्ण केली व कुणाला एका अर्थाने नवा जन्म मिळाला.
विशेष म्हणजे या सर्व उपचारासाठी केवळ साडे आठशे रुपयांचा खर्च आला असून कुणाल चे पालक शिवाजी पाटील यांनी आरोग्य दूत रामेश्वर नाईक जि.प. सदस्य मधुकर काटे डॉ. सागर गवळी तसेच यशस्वी शस्त्रक्रिया करणार्‍या जे.जे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे आभार मानले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.