ग. स. साेसायटीचे उपाध्यक्ष भदाणेंचा राजीनामा !

0

जळगाव : ग. स. साेसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीला अवघे सहा महिने शिल्लक असताना उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान या रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदासाठी १८ जानेवारी राेजी निवडणूक हाेणार असून लाेकसहकार गटाकडून सुनील पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. १७ राेजी हाेणाऱ्या पार्टी मिटिंगमध्ये नाव निश्चित हाेणार अाहे.

अाशिया खंडातील सगळ्यात माेठी सहकारी साेसायटी असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नाेकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग. स. साेसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची गेल्या सात महिन्यांपूर्वी निवडणूक झाली हाेती. सहकार गटात फूट पडून विलास नेरकर व मनाेज पाटील यांच्या नेतृत्वात लाेकसहकार गटाची स्थापना करण्यात अाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनाेज पाटील यांना ११ तर सहकार गटाचे उदय पाटील यांना १० मते मिळाली हाेती. तसेच उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत लाेकसहकार गटाचे श्यामकांत भदाणे यांना १२ तर सहकार गटाचे ज्ञानेश्वर साेनवणे यांना ९ मते मिळाली हाेती. एकहाती सत्ता मिळवलेल्या सहकार गटात उभी फूट पडल्याने जिल्हाभरातील सभासदांमध्ये चर्चेचा विषय ठरला हाेता.

Leave A Reply

Your email address will not be published.