ग्रामीण भागातील बस लवकर सुरू करा – विद्यार्थ्यांचे आमदारांना मागणी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

अमळनेर ; मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील हे कार्यक्रमानिमित्त गलवाडे रोडवरून जात असताना अचानक त्यांना शाळा व कॉलेज चे काही विध्यार्थी रस्त्या लागत उभे असलेले दिसले. आमदारांनी हे चित्र पाहून तात्काळ गाडी थांबवून विद्यार्थ्यांकडे ते पोहोचले. दादासाहेब एस. टी. बस बंद असल्याने आमचे खूपच हाल अन गैरसोय होत असून शाळा, महाविद्यालयात पोहोचणे अवघड होतं आहे. तेव्हा काहीही करा पण एस. टी. बस लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करा अशी केविलवाणी व्यथा रस्त्यावर थांबलेल्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आमदार अनिल पाटील यांच्याकडे मांडली.

विद्यार्थी मित्रांची त्यांनी आस्थेने चौकशी केली, यावेळी सर्वांनी एस. टी. बस बंद असल्यामुळे आमचे खूपच हाल होत आहेत. काही वेळा तर गलवाडे किंवा जवळच्या गावातून पायी सुद्धा चालत यावे लागते. अनेकदा शाळा कॉलेज ला पोहोचण्यास उशीर होत असल्याने शैक्षणिक नुकसान देखील होत असते अशी व्यथा मांडली. तेव्हा एस. टी. बस सुरू करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा अशी विनंती त्यांनी केली.

आमदारांनी विद्यार्थ्यांची व्यथा ऐकून घेत व येणाऱ्या काही दिवसात हा प्रश्न नक्की सुटेल व तुमची हक्काची बस तुमच्या पर्यंत लवकरच पोहोचेल असे आश्वासन आमदारांनी दिले. तसेच स्वतः थांबून व्यथा एकूण घेतल्याबद्दल सर्व विध्यार्थ्यांनी आमदारांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन पुढे ते मार्गस्थ झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.