गुड न्यूज ! करोनाचा प्रभाव नष्ट करणारी लस शोधल्याचा इटलीचा दावा

0

रोम: जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना महामारीने आतापर्यंत जगभरात अडीच लाख नागरिकांचा बळी घेतला आहे. अनेक देशात कोरोना आजारावरील लस शोधण्यासाठी संशोधन असताना इटलीतून एक गुड न्यूज आली आहे.  इटलीने करोना व्हायरसचा प्रभाव नष्ट करणारी लस शोधली असल्याचा दावा केला आहे. ही लस शरीरात अँटीबॉडी तयार करून करोना व्हायरसचा नायनाट करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

इटलीमध्ये २९ हजार जणांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर, २ लाख १३ हजार नागरिकांना बाधा झाली आहे. मंगळवारी ‘सायन्स टाइम्स’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, रोममधील स्पालनजानी रुग्णालयात याची चाचणी करण्यात आली. एका उंदिराच्या शरीरात अँटीबॉडीज् तयार करण्यात आली. त्यानंतर एका करोनाबाधित रुग्णावर याचा प्रयोग करण्यात आला. या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. रोममधील लजारो स्पालनजानी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इन्फेक्शन डिजीजे संशोधकांनी सांगितले की, ज्यावेळी करोनाबाधित रुग्णावर लसीचा वापर करण्यात आला. तेव्हा शरीरात अँटीबॉडी तयार होऊन करोना व्हायरसचा नायनाट झाल्याचे आढळून आले. या रुग्णालयाने कोविड-१९च्या जीनोम सिक्वंस आयसोलेट तयार केले.

दरम्यान, इस्राएलनेदेखील करोनावर लस विकसित तयार केला असल्याचा दावा केला होता. सध्या जगभरात एकूण १०० अधिक लस या प्री-क्लिनिकल ट्रायलवर आहे. त्यातील काही लसींची चाचणी मानवी शरीरावर सुरू करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.