गिरीश महाजनांकडून मनसे-भाजप युतीचे संकेत

0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवमुद्रा असलेल्या नव्या भगव्या झेंड्याचं आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याहस्ते अनावरण करण्यात आलं. दरम्यान, मनसेच्या झेंड्याच्या अनावरणानंतर भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मनसे-भाजप युतीचे संकेत दिले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विषम विचारी पक्ष एकत्र येत असतील, मग आम्ही तर समविचारी आहोत, असं म्हणत गिरीश महाजनांनी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला लगावला.

मनसेने जो झेंडा घेतला आहे, त्यामध्ये हरकत घेण्यासारखं काही वाटत नाही. आमचे मित्रपक्ष झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो घेऊन फिरतात. मनसेने फक्त झेंड्याची काळजी घ्यावी, असं गिरीश महाजन यांनी सुचवलं.

Leave A Reply

Your email address will not be published.