गिरणा धरणातून २० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग

0

चाळीसगाव  (प्रतिनिधी) : आज सकाळी गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून २० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. नाशिक जिल्ह्याच्या काल परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने धरणामध्ये पाण्याच्या येव्यात वाढ होत आहे.

आज ११ वाजता धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे. नदीकाठालगत असणा-या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहे. धरणातून २० हजार क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गिरणा धरणाचे हे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. १९६९ मध्ये ते पहिल्यांदा १०० टक्के भरले. यानंतर तब्बल ११ वर्षांनी म्हणजेच २००७ नंतर यावर्षी नव्यांदा ओव्हरफ्लो झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.