तळेगाव येथे पोषण चळवळ सप्ताहाचे आयोजन

0

जामनेर (प्रतिनिधी): –  तालुक्यातील तळेगाव येथील अंगणवाडीत पोषण चळवळ सप्ताहाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

या पोषण चळवळ सप्ताहात पोषण चौपाल याला अनुसरून कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी परिसरातील स्वच्छता, स्वच्छतागृहांची उपलब्धता व संतुलित आहाराचे महत्त्व सांगण्यात आले असून पाककृती घेऊन पूरक पोषण आहार कसा बनवावा याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.बालविकास प्रकल्पाधिकारी ईश्वर गोयर,पर्यवेक्षिका जया जाधव यांनी मार्गदर्शन केले.यावेळी अंगणवाडी सेविका सगुना हिवाळे,पुष्पा शिंपी,रंजना पाडोळसे,निर्मला माळी,मदतनीस आनंदी माळी,जयश्री चौधरी,ज्योती जाधव,आरती कुलकर्णी, गजमल कोळी,नंदकिशोर शिंदे,विजय वाघ,गोपाल पाटील आदीसह गरोदर,स्तनदा माता,महिला व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Leave A Reply

Your email address will not be published.