गाळेधारकांना थकबाकी भरण्यासाठी उरले दोन दिवस

0

264 चेकद्वारा गाळेधारकांचे 14 कोटी जमा

11 पर्यंत पुर्ण थकबाकी भरल्यास तीन महिन्यांची शास्ती नाही

जळगाव- महानगरपालिका प्रशासनाने गाळेधारकांना थकबाकी भरण्यासाठी दि. 11 ऑक्टोबर पर्यंत मुदत दिलेली आहे. ती मुदत शुक्रवारी संपणार असून त्यानंतर मनपातर्फे गाळेधारकांविरुद्ध कारवार्इ करण्यात येणार आहे.

गाळेधारकांनी 11 ऑक्टोबरपर्यंत थकबाकी पुर्ण भरली तर त्यांना तीन महिन्यांची शास्ती लावण्यात येणार नाही, अशी माहिती उपायुक्त महसूल डॉ. उत्कर्ष गुटे यांनी दिली.गाळेधारकांनी आतापर्यंत 264 चेकद्वारे आतापर्यंत 14 कोटी रुपयांची थकबाकी जमा केलेली आहे.

एका गाळेधारकाने केले 26 लाख जमा

सेंल फुले मार्केट येथे पाच गाळे असणाऱ्या प्रदिप सुद्रनाथ जैन या गाळेधारकाने दि. 9 बुधवारी मनपा प्रशासनाकडे एकूण उर्वरित थकबाकी  26 लाख जमा केली आहे. प्रदिप जैन यांच्याकडे मनपाचे 51 लाख 68 हजार 578 रुपयांची थकबाकी होती. त्यांनी याआधी थकबाकीची काही रक्कम भरली होती. तर उर्वरित रक्कम 26 लाख त्यांनी दि. 9 रोजी जमा केली आहे. याद्वारे त्यांनी मनपाची पुर्ण थकबाकी भरली असल्याने त्यांना प्रशासनाकडून थकबाकी निल असल्याचा दाखला देण्यात येणार आहे.

अनधिकृत गाळेधारकांकडे 60 लाखाची बाकी

शहरातील फुले मार्केट येथील अनधिकृत गाळेधारकांकडून  मनपा प्रशासनाचे 60 लाख रुपये तर 10 गाळेधारकांकडून मनपा प्रशासनाची 30 लाखाची मागणी आहे. यांच्यावर येत्या 11 तारखेनंतर व ज्यांनी अद्याप मनपाची एक रुपयाची थकबाकी भरलेली नाही त्यांच्यावर कडक कारवार्इचा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.

निवडणुक होर्डिंग्सपोटी 22लाखाचे उत्पन्न

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेला होर्डिंग्सपोटी मनपा प्रशासनाला22 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान दि. 9 रोजी विधानसभेच्या जळगाव शहर मतदार संघाच्या उमेदवारांना वाहन परवाने देण्यात आले.

 दुचाकीवर मतदानाची परवानगी

शहर मतदार संघातील अपक्ष उमेदवार ललीत गौरीशंकर शर्मा हे दुचाकीवर आपला प्रचार करणार आहेत. तशी परवानगी त्यांनी मनपा प्रशासनाकडे मागितली आहे. तसेच अपक्ष उमेदवार शिवराम पाटील यांनी बैलगाडीवर प्रचार करण्याची परवानगी मागितली असल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.