भुसावळात श्रीदुर्गा देवी विसर्जन उत्साहात व आनंदाने संपन्न

0

मुख्य मिरवणुकीत 43 मंडळांचा सहभाग ;रात्री उशिरापर्यंत भाविकांचा मिरवणुकीत जल्लोष

भुसावळ (प्रतिनिधी)- ढोल-ताशे, डफ व ऑक्टोपॅडच्या तालावर तसेच गरबा नृत्य करीत बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. काही मंडळांनी मुख्य मिरवणुकीत सहभागी न होता दुर्गा विसर्जन केले तर 43 मंडळे मात्र मुख्य मिरवणुकीत सहभागी झाली. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 63 तर बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 84 मंडळांनी दुर्गा देवी मातेच्या विविध रूपांच्या मूर्तीची स्थापना केली होती. नऊ दिवसांच्या उत्सवानंतर शहर व बाजारपेठ हद्दीतील 43 मंडळांनी मुख्ख मिरवणुकीत सहभाग नोंदवला. रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीचा जल्लोष कायम होता.

Leave A Reply

Your email address will not be published.