गल्लीपासून जि.प.पर्यंत तडजोडीची साखळी! भाग १७

0

बुरशीयुक्त शेवया प्रकरण : वरिष्ठ अधिकार्‍यांचे अक्षम्य दुर्लक्ष

जळगाव, दि. 27 –
जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांमध्ये पुरवठा होणार्‍या बुरशीयुक्त शेवयाप्रकरणी गल्लीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत तडजोडीची साखळी असल्याचे समोर आले असून वरिष्ट अधिकार्‍यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने या प्रकरणाला खतपाणी मिळत आहे.

 गल्ली ते जि.प साखळी
बुरशीयुक्त शेवयाप्रकरणात गल्लीच्या सेविकेपासून जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांची एक तडजोड साखळी असून ही साखळीच हे प्रकरण दडपण्यासाठी नवनव्या उक्त्या शोधत असून त्याला लोकप्रतिनिधी खतपाणी घालत आहेत.

पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील प्रकरणानंतर जिल्ह्यातील पंधरा अंगणवाड्यांची रँडम पद्धतीने चौकशी करण्यात आली. त्याचा अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाले असूनही त्यावर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नसल्याने या प्रकरणात काही तरी कारेबेरे असल्याची शंका निर्माण होत असून लोकप्रतिनिधी ठेकेदार व अधिकार्‍यांना वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. जिल्हा परिषद सदस्या रेखा राजपूत यांनी पुराव्यानिशी हे प्रकरण प्रशासनाकडे सादर करुनही प्रशासनाने याची गंभीर दखल न घेता अधिकारी व ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे. कारवाई करण्याच्या मुद्दावरुन सत्ताधारी भाजपात दोन गट पडले असून त्या दोघांच्या भांडणात मात्र बालकांचे शोषण होत आहे. अधिकार्‍यांनी या बुरशीयुक्त शेवयांची शाळा भरवली असताना देखील त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने आर्श्‍चय व्यक्त होत आहे. सत्ताधारी भाजपाचा पदाधिकारीच ठेकेदार असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.