खेळात सातत्य असणार्‍या मुलींना बीपीसह कॅन्सरची भीती कमीच – डॉ.मनाली लोंढे

0

भुसावळ (प्रतिनिधी) :- खेळाडू क्रीडा प्रावीण्य याबरोबरच अभ्यासातही प्रावीण्य मिळू शकतात. वेळेचे नियोजन, आत्मपरीक्षण, सर्वांना बरोबर घेऊन जायची वृत्ती, संघटन कौशल्य ही व्यक्तिमत्व विकासातील प्रमुख वैशिष्ट्ये खेळातील सहभागामुळे आपोआप वाढीस लागतात, असे मत मुंबईच्या सोमय्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मनाली लोंढे यांनी येथे व्यक्त केले. प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात शारीरिक शिक्षण आरोग्याद्वारे महिलाचे सशक्तिकरण या विषयावर झालेल्या एक दिवसीय परीषदेत त्या बोलत होत्या.

पुरुष आणि स्त्री ही एका सर्वोच्च ऊर्जेची प्रकट रूपे

डॉ.मनाली लोंढे म्हणाल्या की, वैदिक पूर्व काळातील आणि वैदिक उत्तरकाळात सुद्धा महिलांचे स्थान फार उच्च होते. त्यांचा आदर केला जात होता. जेव्हा आपण शिवाची पूजा करत असतो तेव्हा दैवी शक्तीला पुजत असतो. सांख्य तत्वज्ञान आताही पुरुष जगाच्या उत्पत्तीसाठी पुरुष आणि प्रकृती हे दोघं एकमेकांना पूरक म्हणूनच स्पष्ट केले आहे. पुरुष आणि स्त्री ही एका सर्वोच्च ऊर्जेची प्रकट रूपे आहेत. मनूच्या मतानुसार या समाजात स्त्रीची पूजा केली जाते. तेथे देवाचे वास्तव्य असते. खेड्यातील मुलींचा सहभाग आणि त्यामुळे होणारे फायदे या विषयी त्या बोलताना पुढे म्हणाल्या की नेतृत्वगुण इतरांप्रति आदर, तणावाखाली ही मनाची ठेवता येणारी एकाग्रता उद्दिष्ट ठरवून साध्य करण्याची शक्ती, गीतेत सांगितल्याप्रमाणे सुख आणि दुःख या प्रती असणारे आणि त्याप्रमाणे समानता ठेवणे. या खेळाचा फायद्याबरोबरच ज्या मुली खेळांमध्ये सातत्य ठेवतात. त्यांची तब्येत सुद्धा निरोगी राहते.

परीषदेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वालनाने झाले. प्रसंगी श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य डॉ.संदीप जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. उपप्राचार्य डॉ.शिल्पा पाटील अध्यक्षस्थानी होत्या.सूत्रसंचालन प्रा.आर.एच.पाटील यांनी केले. प्रा.माधुरी भुतडा यांनी पाहुण्यांचा परीचय करून दिला तर परीषदेचे समन्वयक प्रा.वाय.डी.देसले यांनी प्रास्ताविक केले.

खेळाडूंच्या आरोग्याकडे लक्ष द्या

डॉ.दिनेश पाटील म्हणाले की, ज्यामुळे महिलांवर अत्याचार होत आहे त्याठिकाणी जर शारीरीक शिक्षण असते तर महिलांवर अत्याचार होणार नाही कारण या शारीरिक शिक्षणात उत्तराला उत्तर देण्याची ताकद आहे. आपण मुलींशी खुलेपणाने किती संवाद करतो? सांगताना पद्धत कशी असावी? तुझे हे चुकते हे केले तर अजून चांगले करू शकते ही महिला सबलीकरणाचे अत्यंत चांगली गोष्ट आहे. खेळाडूंच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. ‘खेलो इंडिया’हा त्याचाच एक भाग आहे तसेच विद्यार्थ्यांशी संपर्क साधा, सहभागी व्हा आणि सकारात्मक विचाराने सुरुवात करा तरच मुली खेळाकडे येतील.

शारीरीक शिक्षण सक्तीचे व्हावे

डॉ.शिल्पा पाटील म्हणाल्या की, आमच्या मुली खेळांमध्ये मागे का आहेत ? यासाठी पालकांची मानसिकता विचारात घेणे जरूरीचे आहे. आपल्या पाल्यांना आपण मैदानावर पाठवतो का या करीता प्रत्येक विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण हे सक्तीचे झाले पाहिजे तरच त्यांचे आरोग्य सुदृढ होऊन त्यांचा चौफेर व्यक्तिमत्त्व विकास वाढेल. समन्वयक माधुरी भुतडा यांनी आभार मानले. राष्ट्रीय परीषद यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.मंगला साबद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ.जे.व्ही.धनवीज यांच्यासह प्राध्यापक व प्राध्यापक इतर कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले. या परीषदेमध्ये ४८ शारीरिक शिक्षण संचालकांनी भाग नोंदवला.

Leave A Reply

Your email address will not be published.