खुशखबर : Yamaha ने १९,३०० रुपयांपर्यंत कपात केली या दोन बाइकची किंमत

0

नवी दिल्ली : तुम्हाला जर यामाहाची बाइक खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.  दुचाकी वाहन निर्माता कंपनी यामाहा इंडियाने (Yamaha India) आपल्या दोन मॉडेल एफझेड 25 (FZ 25) आणि एफझेडएस 25 (FZS 25) च्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. FZ 25 ची किंमत 18,800 रुपयांनी आणि FZS 25 ची किंमत 19,300 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला स्वस्त किंमतीत या बाइक खरेदी करता येऊ शकते.

Yamaha FZ 25 ची नवीन किंमत 1,34,800 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी निश्चित करण्यात आली आहे आणि Yamaha FZS 25 ची अपडेटेड किंमत 1,39,300 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे. यापूर्वी FZ 25 आणि FZS 25 ची किंमत अनुक्रमे 1,53,600 आणि 1,58,600 रुपये इतकी होती.

यामाहाने निवेदनात म्हटले आहे की, दुचाकी वाहन उत्पादक कंपनीने इनपुट खर्चात कपात करून FZ 25 आणि FZS 25 च्या किंमती कमी करण्यात यश मिळविले आहे. या किंमती कमी झाल्याने यामाहाला या दोन्ही मोटारसायकलींच्या विक्रीत वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

Yamaha FZ 25 आणि Yamaha FZS 25 मोटारसायकली 249 सीसी सिंगल-सिलिंडर इंजिनसह सुसज्ज आहेत. हे इंजिन फाईव्ह स्पीड ट्रान्समिशनने जोडलं आहे. हे इंजिन 8,000 rpm वर 20.5 hp मॅक्सिमम पॉवर आणि 6,000 rpm वर 20.1 nm पीक टॉर्क जनरेट करतं.

Yamaha India कंपनी सध्या FZ-X या नव्या बाईकवर काम करत आहे. हे मॉडेल टेस्टिंग फेजमध्ये आहे. तसेच कंपनीने नुकताच त्यांचा ‘ट्रेसर’ हा सब ब्रँड रजिस्टर केला आहे. असं म्हटलं जातंय की, जपानी वाहन निर्माता कंपनी आगामी काळात भारतात ट्रेसर 700 आणि ट्रेसर 900 मॉडेल लाँच करु शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.