खुशखबर! आतापर्यंत तब्बल 12,000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; तपासा आजचे नवीन दर

0

मुंबई : तुमच्या घरी सनई-चौघडे वाजणार असतील आणि सोनं खरेदीचा बेत असेल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. कारण सोन्याच्या दरात घसरण झाल्यास पुन्हा एकदा सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. आतापर्यंतचे सोन्याचे दर पाहता तब्बल 12 हजार रुपयांची घट झाली आहे.

सोने-चांदी दरात आज तेजी पाहायला मिळाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव आज 0.4 टक्के वाढीसह 44,915 रुपयांवर आहे.

चांदीचा दर 0.6 टक्के वाढून 67,273 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. सोन्याच्या किंमतीत आतापर्यंत जवळपास 12000 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. तर चांदी 11000 रुपये स्वस्त झाली आहे. फक्त 2021 या वर्षामध्ये सोन्याचा भाव हा जवळपास 6 हजार रुपयांपर्यंत कमी झाला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48,180 रुपये आहे. तर चेन्नई 46,170 रुपये, मुंबई 44,880 रुपये, कोलकाता 46,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात तेजी आहे. अमेरिकेत सोन्याचा व्यापार 0.14 डॉलरच्या तेजीसह 1,727.22 डॉलर प्रति औस इतका रेट आहे. तर चांदी 0.09 डॉलर वाढीसह 26.02 डॉलर इतकी आहे. दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी 12 मार्च 2021 रोजी सोन्याचा भाव 291 रुपयांच्या घसरणीसह 44,059 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव शुक्रवारी 1096 रुपये कमी होऊन 65,958 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता.

भारतात येत्या काळात लग्नसमारंभामुळे सोन्या-चांदीची मोठी खरेदी होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या किंमतीत सोन्यात गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. तसेच 2021 मध्ये सोन्याचा भाव वाढणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. 2021 वर्षात सोन्याचा दर हा 63000 पर्यंत पोहचण्याचा जाणकारांचा अंदाज आहे. जर असं झालं तर सोन्यात गुंतवणूक केलेल्यांना मोठा फायदा होऊ शकतो. एका हिंदी वेबसाईटन याबाबतचे वृत्त दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.