आमदार महाजनांच्या हस्ते शासकीय खरेदी केंद्राचा शुभारंभ

0

जामनेर(प्रतिनिधी): – शहरातील शेतकरी सहकारी संघाच्या आवारात तुर आणी हरबरा (चना) शासकीय खरेदी केंद्राचा शुभारंभ माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी काटा पुजन करून शुभारंभ केला.

यावेळी शेतकीसंघाचे सभापती चंद्रकांत बावीस्कर,उपसभापती बाबुराव गवळी तर संचालकांमधे डॉ सुरेश पाटील,रंगनाथ पाटील,रमेश नाईक,डॉ भरत पाटील,डोंगरसींग नाईक,बिरबलदादा पाटील,नाना पाटील,प्रभाकर पाटील,व्यवस्थापक गोपाळ पाटील यांचेसह शेतकरी-कर्मचारी उपस्थित होते.आतापर्यंत तालुकाभरातुन सुमारे १६०० वर शेतकऱ्यांनी आपल्या मालाची ऑनलाईन नोंदणी केली असुन तुरीला ६००० तर हरबरा ५१०० रूपये प्रती क्विंटलने खरेदी करण्यात येईल आदी माहितीही सभापती बावीस्कर यांनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.