खासदार, आमदारांसह 5 हजार नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे आगमन व स्वागतानिमीत्त मिरवणूक काढतांना 200 लोकांपेक्षा जास्त जणांचा जनसमुदाय एकत्र येणार नाही अशी अट असतांना मिरवणूक परवानगीच्या अटी शर्तीचा भंग केला म्हणून खासदार, आमदार, नगराध्यक्षा, माजी आमदार व पुतळा आगमन समितीचे सदस्य अशा 18 व इतर अनोळखी 4 ते 5 हजार जणांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव येथे सिग्नल चौकात रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली.  या ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे आगमन व स्वागत निमीत्ताने  शासनाकडून जळगाव जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा एकत्र जमाव एकत्र जमण्यास व पूर्व परवानगी शिवाय मिरवणूक व सभा घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असताना  दि26 रोजी दुपारी 3 ते रात्री 8;30 दरम्यान बिलाखेड ते चाळीसगाव सिग्नल चौकदरम्यान 4 ते 5 हजार अनोखळी जनसमुदायांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून अटी व शर्तींचा भंग केला.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलीस नाईक भटू पाटील यांनी दिेलेल्या फिर्यादीवरून श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आगमन समितीचे सदस्य घृष्णेश्वर पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, राजेंद्र चौधरी, संजय रतनसिंग पाटील, शाम देशमुख, भगवान पाटील, शेखर देशमुख, जगदीश चौधरी, पंचायत समिती सदस्य संजय पाटील, रमेश चव्हाण, सुर्यकांत ठाकूर, नितीन पाटील, सदानंद चौधरी आदी 18 व इतर अनोळखी 4 ते 5 हजार जणांच्या विरोधात भादंवि कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005चे कलम 51बी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे 37(3)(1) व 135 प्रमाणे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.