खामगावात सोमवार सकाळपर्यंत संचारबंदी

0

खामगाव- शहरातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या सुधारीत आदेशानुसार शहरात आज शुक्रवार 26 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजेपासुन ते सोमवार 1 मार्च सकाळी 7 वाजेपर्यंत शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

संचारबंदीमुळे शहरातील सर्व व्यवसाय, आस्थापना, दुकाने पुर्णपणे बंद राहतील मात्र दुध विक्रेता व दुध डेअरी या संचारबंदी काळात सकाळी 6 ते दुपारी 3 व सायंकाळी 6 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच मेडीकल दुकाने व दवाखाने नियमीत सुरू राहतील. या व्यतीरिक्त सर्व दुकाने व आस्थापने पुर्णपणे बंद राहणार आहे. नागरिकांनी वारंवार हात धुणे, सोशल डिस्टंसींगचे पालन करणे, विनाकारण घराबाहेर न पडने, इत्यादी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. अन्यथा दंडात्मक कायदेशरी कारवाई करण्यात येईल. याची संबंधितांनी नोंद घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती मुख्याधिकारी नगर परिषद खामगाव यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात 391 पॉझिटिव्ह

बुलडाणा ः  आज जिल्ह्यात 391 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये बुलडाणा 81, खामगाव 42, शेगाव 20, दे. राजा 39, चिखली 23, मेहकर 30, मलकापूर 29, नांदुरा 45, लोणार 13, मोताला 6, ज.जामोद 42, सि.राजा 3, संग्रामपूर 2 व सिद्धीविनायक हॉस्पीटल बुलडाणा येथील 6 असे 391 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. जिल्ह्यात एकुण 17979 रूग्ण असून 15258 रूग्णांना वैद्यकीय प्रोटोकालप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तर 2529 रूग्णांवर सध्या उपचार सुरू असून जिल्ह्यात 192 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी मास्क वापरावे तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.