खानदेशात कानबाई मातेचा उत्सव जल्लोषात! शिरूड गावातुन कानबाई मातेला भावपूर्ण निरोप..

0

 अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ता शिरूड कानबाई उत्सव आणि खानदेशातील संबंध अतूट आहेत. महाराष्ट्रात खानदेशखेरीज अन्य कुठेही हा उत्सव साजरा होत नाही. मात्र, वर्षानुवर्षांच्या रूढी- परंपरांना छेद देत काळानुसार या उत्सवाला आता आधुनिकतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या कानबाई मातेचा उत्सव आजपासून सुरू झाला आहे. काल (दि. १५)  दुपारी कानबाई मातेची स्थापना करण्यात येणार आली. दरम्यान, आज सोमवारी (दि. १६) रोजी सकाळी विसर्जन कऱण्यात आले.

कानबाई ही खानदेशातील प्रमुख कुलदैवत मानली जाते. खानदेशातील ब्राह्मण, वाणी, मराठी, सोनार, शिंपी, सुतार, लोहार, नाभिक, माळी, चांभार आदी समाजबांधव श्रावणातील शुक्‍ल पक्षात कानबाईची पूजा करतात. या देवतेची खानदेशात कोठेही यात्रा भरत नाही. कानबाई ही नवसाला पावणारी देवता असल्याने ‘नवसपूर्ती’ करण्यासाठी भाविक कानबाईची प्रतिष्ठापना करतात.

 

पूर्वी गावात केवळ एक- दोन ठिकाणी मानाप्रमाणे कानबाईची प्रतिष्ठापना केली जात असे. त्यासाठी सर्व समाजांच्या भाऊबंदकीमधील घटक एकत्रित येत. मात्र, काळाच्या ओघात जातीपातींतील गट-तट, भाऊबंदकीतील वादविवाद, एकत्रित कुटुंबपद्धत या संकल्पनांना छेद देत हा उत्सव साजरा केला जात असल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे हा उत्सव आता काही कुटुंबे, समाजांपुरताच उरल्याचे दिसते.कानबाईचे पारंपरिक महत्त्व कानबाई प्रतिष्ठापनेवेळी पितळी अथवा लाकडी मुखवटा धारण केलेली मूर्ती अथवा श्रीफळाची पूजा-अर्चा करून त्यास ‘कानबाई’ असे संबोधून हिरवे वस्त्र परिधान करून आभूषणांनी सजवून प्रतिष्ठापना केली जात असे.

या उत्सवांतर्गत केले जाणारे ‘रोट’ त्या- त्या समाजातील, भाऊबंदकीतील सदस्य एकत्रित येऊन केले जात असतात. तसेच कानबाई प्रतिष्ठापना अथवा ‘रोट’ करतेवेळी भाऊबंदकीत यंदा कोणाचा मृत्यू तर झालेला नाही ना, तसेच कुटुंबातील स्त्री प्रसूत झालेली नाही ना, हे आवर्जून तपासले जात असते. मात्र, आता या गोष्टींकडे फारसे कुणीही लक्ष देत नसल्याचे दिसत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.