खळबळजनक.. रुग्णालयाच्या आवारात सापडल्या 11 कवट्या आणि 56 अवयव

0

वर्धा, लोकशाही न्यूज नेटवर्क

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथून एक भयंकर घटना समोर आलीय. अल्पवयीन मुलीच्या झालेल्या गर्भपाताच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला होता. आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करून डॉ. रेखा कदम हिला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पथकाने तपासणी केली असता समोर आलेले दृश्य भयावह होते.

याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयाच्या मागील बाजूस तपासणी केली असता गोबरगॅस चेंबरमध्ये भ्रूण आणि हाडांचे काही अवशेष सापडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणामुळे खळबळ माजली आहे. अशी माहिती समोर येते आहे की डॉ रेखा कदम यांच्या रुग्णालयाच्या मागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत नवजात भ्रूणाचे 11 कवटी सदृश्य अवयव आणि 56 इतर अवयव सापडले आहेत. यावरुन हे प्रकरण एकाच घटनेपर्यंत मर्यादित नसल्याचा अंदाज बांधला जात आहे.

नेमकं काय आहे हे प्रकरण?

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला जेव्हा एका अल्पवयीन मुलीचा अधिकचे पैसे आकारून गर्भपात केल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी आर्वी पोलिसात देण्यात आली होती. या प्रकरणात मुलीसह आई वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. महिला डॉ. रेखा कदम यांना अटक केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांच्या तपासात गोबर गॅस मध्ये लहान हाडांचा सांगाडा सापडल्यानंतर आर्वी पोलिसांनी रेखा कदम आणि त्यांच्या एक कर्मचाऱ्याला अटक केली. आरोपी असणाऱ्या महिला डॉ. रेखा कदमची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. आर्वी येथील डॉ रेखा कदम यांच्या रुग्णालयाच्या मागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत भ्रूणचे 11 कवटी सदृश्य अवयव आणि 56 इतर अवयव सापडले आहेत.

5 जानेवारी रोजी एका 13 वर्षीय मुलीचा डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयात गर्भपात करण्यात आला होता. गोबरगॅस मध्ये मिळालेली ही हाडं वैद्यकीय चाचणीसाठी तालुका वैद्यकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे पाठवण्यात आली आहेत. मात्र या घटनेनंतर डॉक्टर रेखा कदम यांच्या रुग्णालयात नेमकं काय चालतं याबाबत सवाल उपस्थित होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.