खराब रस्त्यांमुळे आयशर उलटला !

0
भुसावळ (प्रतिनिधी )- रावेरकडून जळगावकडे जाणारा आयशर ट्रक जळगाव रस्‍त्‍यावरील सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याजवळ रस्त्यावरील खड्डे चुकवताना  आयशर ट्रक क्र.एमएच.१९ झेड.५५७६ हा खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात उलटला. .३० ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी ३-३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत एका फळ विक्रेत्याच्या हातगाडीचे जवळपास १० ते १२ हजारांचे नुकसान झाले मात्र सुदैवाने नागरीक या अपघातात बचावले.शहरात खराब रस्त्यांमुळे लहान मोठे अपघात दररोज होत असून त्‍याची डागडूजीदेखील नसल्याने शहरातील नागरिक व वाहनधारकांमध्ये सत्ताधार्‍यांवर प्रचंड रोष आहे.अपघातानंतर भुसावळ शहर पोलिसांनी धाव घेत गर्दी हटवली.

Leave A Reply

Your email address will not be published.