कोविड प्रमाणेच मान्सूनमधील आपत्तींसाठी तयार रहा ; प्रांत सीमा अहिरे

0

अमळनेर (प्रतिनिधी) : कोविड ची आपत्ती भयानक असली तरी प्रत्येक वर्षाप्रमाणे मॉन्सून पूर्व व मान्सून मध्ये येणाऱ्या आपत्तीसाठी आता तयार असले पाहिजे अशा सूचना प्रांताधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन च्या ऑनलाईन मीटिंग मध्ये सर्व विभाग प्रमुखांना केल्या.त्यातच काल तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे व मॉन्सून पूर्व पावसामुळे ३ जणांना आपला जीव गमवावा लागला यामुळे या मीटिंग ला विशेष महत्व प्राप्त झाले होते.

महसूल, विद्युत, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, नगरपालिका, रा.परिवहन महामंडळ, तसेच इतर सर्वच विभागाला सूचना देण्यात आल्या.जीवितहानी व वित्तहानी च्या घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने सतर्क असले पाहिजे यासाठी आपल्या परीने उपाययोजना करण्यावर भर देण्यासाठी प्रयत्नशील राहण्यावर चर्चा करण्यात आली.

प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या ऑनलाईन मीटिंगला तहसीलदार मिलिंदकुमार वाघ इतर सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.