कोळी समाजाचा राष्ट्रीय वधू-वर मेळावा 29 डिसेंबरला जळगांव येथे संपन्न होणार

0

मेळाव्यासाठी संपूर्ण भारतातून समाजाचे प्रतिष्ठित मान्यवर तसेच समाजबांधवांची राहणार उपस्थित
जळगाव, –  श्री माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्था जळगाव संचलित कोळी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा रविवार, दि.29 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता सरदार वल्लभभाई पटेल हॉल, बीएसएनएल ऑफिसमागे, जळगाव येथे संपन्न होणार आहे. हा मेळावा घेण्याच्या मागील हेतु हाच की, आदिवासी कोळी समाज हा महाराष्ट्रातच नव्हे तर भारत देशामध्ये विखुरलेला आहे आणि या समाजाला कोठे तरी एकत्र आणून, विचारांची देवाण-घेवाण करुन, समाज बांधवांच्या विविध उद्भवणार्‍या समस्या जाणून त्या सोडविण्याचा आम्ही केलेला हा छोटाचा प्रयत्न. मग त्यात जातीचा दाखला असो, समाजातील मुलांच्या शिक्षणाच्या समस्येविषयी मार्गदर्शन तसेच उच्च शिक्षित उपवर मुला-मुलींच्या योग्य जोडीदार मिळावा व समाजाचा सर्वांगिण विकास होऊन समाजाला याचा लाभ व्हावा.

या राष्ट्रीय वधू-वर परिचय मेळाव्यासाठी जळगाव जिल्ह्यासह गुजरात, मध्यप्रदेश, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, अमरावती, अकोला, सांगली, बीड, सातारा, बुलढाणा आदी सर्व जिल्ह्यांमधील समाजाचे प्रतिष्ठीत मान्यवर तसेच समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.

तसेच कोळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार मा.श्री.रमेशदादा पाटील साहेब, सौ.लताताई चंद्रकांतजी सोनवणे (चोपडा आमदार) तसेच आ.श्री.गुलाबरावजी पाटील (माजी सहकार राज्यमंत्री), श्री.चंद्रकांतजी सोनवणे (माजी आमदार चोपडा), श्री.चंद्रकांतजी निंबाजी पाटील (आमदार मुक्ताईनगर), आ.श्री.गिरीषभाऊ महाजन (माजी जलसंपदा तथा वैद्य. शिक्षणमंत्री), श्री.गुलाबराव देवकर (माजी परिवहन राज्रमंत्री), श्री.एकनाथरावजी खडसे (माजी महसुल मंत्री), आ.श्री.चंदुभाई पटेल (विधान परिषद सदस्र जळगाव), मा.श्री.अनिलभाऊ चौधरी (माजी नगराध्रक्ष भुसावळ), आ.श्री.राजुमामा भोळे (विधानसभा सदस्य मबई), रुवा प्रदेशाध्रक्ष कोळी महासंघाचे श्री.अ‍ॅड.चेतनदादा पाटील उपस्थित राहणार आहेत. तरी समाज बांधवांसाठी हा मेळावा आम्ही डिजिटल करणार असून या वधू-वर परिचय मेळाव्यात वधु-वरांची लाईव्ह शुटींग घेऊन डिजीटल डिव्हीडी, सीडी तयार करण्यात येणार आहे. तसेच सर्व कार्यक्रम संगीतमय वातावरणात पार पडणार असून या मेळाव्यात स्नेह भोजनाची व्यवस्था हॉलच्या पंटागणात मंडप टाकून करण्यात आलेली आहे. तसेच मेळाव्यामध्ये उपवर मुला-मुलींनी नाव नोंदणी केलेल्या फोटो व परिचयपत्रासह वधु-वर सूचक पुस्तिका तयार करण्याचे काम सुरु आहे. वधू-वर नाव नोंदणीला भरघोस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 200 उपवर मुला-मुलींची नोंदणी झालेली आहे. तसेच मेळाव्याच्या दिवशी जी नाव नोंदणी होईल तेही या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात येईल.

तरी समाज बांधवांनी विवाह पात्र मुला-मुलींची संपूर्ण माहिती भरुन उमेश बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हल्पर्स, विसनजी नगर, डॉ.पराग चौधरी हॉस्पीटल शेजारी, जळगाव येथे पाठवावी. वधू-वर परिचय मेळाव्याची संपूर्ण तयारी झालेली असून समाज बांधवांनी विवाह योग्य वधू-वरांची लवकरात लवकर नांव नोंदणी करुन मेळाव्यास उपस्थित राहुन संस्थेस सहकार्य करावे, असे अवाहन संस्थेचे अध्यक्ष मुकेशभाऊ सोनवणे, नामदेव सोनवणे, वासुदेव सोनवणे, रामचंद्र मुरलीधर सोनवणे, संदीप कोळी, कडूभाऊ कोळी, सुभाष सोनवणे, खेमचंद सपकाळे, राजु सोनवणे, प्रदिप सोनवणे, भगवान सपकाळे, बाबुराव सपकाळे यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.