नांद्रा वि.का. सोसायटीच्या चेअरमनपदी त्र्यंबक पाटील तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र बाविस्कर

0
पाचोरा  प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे विकास सोसायटीची चेअरमन व व्हा. चेअरमन निवड करण्यात आली. यावेळी अधिकारी व सर्व संचालक उपस्थित होते. या निवडणुकीत विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या नांद्रा येथील संस्थेच्या चेअरमनपदी त्र्यंबक बळीराम पाटील तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र बाविस्कर यांची निवड बिनविरोध करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे तंज्ञ संचालक नितिन तावडे, विश्वनाथ सुर्यवंशी, संस्थेचे सचिव गजानन जोडगन, पॅनल प्रमुख योगेश सुर्यवंशी, ज्योतीराम भोई, मुरलीधर पाटील, सुर्यकांत पाटील, नंदु बागूल, रमेश पाटील व निवडणूक अधिकारी सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.