कोळी क्रिकेट लिगच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोळी क्रिकेट लिग पर्व दुसरे स्पर्धेची सुरुवात झाली असून १० ते १२ डिसेंबर पर्यंत असून शिवतीर्थ मैदान येथे सामने आयोजित केले आहेत. या स्पर्धेत एकूण दहा संघानी प्रवेश घेतला असून सामने लीग पद्धतीने सुरू आहेत.

महर्षि वाल्मिकी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन आणि  शहिदांना आदरांजली देत स्पर्धेला सुरुवात झाली.

पहिला सामना अंजली ट्रॅक्टर विरुद्ध माँ संघाशी झाला. यात अंजली ट्रॅक्टरला ६७ धावांचे माफक आव्हान सहा षटकात पूर्ण केले. दुसऱ्या सामन्यात सोनवणे वॉरियर संघाने हुप पहिलवान संघांवर ४१ धावांनी विजय मिळविला.

उद्घाटन प्रसंगी आमदार चंद्रकांत सोनवणे, कोळी महासंघ अध्यक्ष रमेश पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, प्रभाकर सोनवणे, जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष शामकांत सोनवणे, शिवसेना महानगर अध्यक्ष शरद तायडे, सामाजिक कार्यकर्ते भरत सपकाळे, सागर सोनवणे, डॉ. अश्विन सोनवणे, राहुल ठाकरे, डॉ. परीक्षेत बाविस्कर, सागर सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते विनोद तायडे, राहुल ठाकरे, इंजि. राहुल सोनवणे, दिनेश सोनवणे यांची उपस्थिती लाभली.

Leave A Reply

Your email address will not be published.