कोरोना लसीकरणाआधी युवकांनी रक्तदान करावे ; खा.रक्षा खडसे

0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : कोरोना संकटात रुग्णांसाठी रक्तसाठा तसेच प्लाझ्मा मुबलक प्रमाणात उपलब्ध असावा यासाठी भाजपा व भाजयुमो भुसावळ यांच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येऊन, खासदार रक्षाताई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कोरोना लसीकरणाआधी युवकांनी रक्तदान करावे असे आव्हान  खा. रक्षाताई खडसे यांनी यावेळी केले.

संपूर्ण महाराष्ट्रात आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा पडू नये; तसेच कोरोना लसीकरण झाल्यावर दोन महिने रक्तदान करता येत नसल्यामुळे संभाव्य परिस्थितीत आरोग्य यंत्रणा आणि रक्तपेढी मुबलक प्रमाणात रक्त साठ्याने सुसज्ज असावी.सध्या महाराष्ट्र कोरोना प्रादुर्भावामुळे बिकट परिस्थितीतून जात आहे. सामान्य जनतेला अयोग्य सुविधा, औषधी, लसीकरण, कोविड चाचणी यासह रक्ताचा तुटवडा, लसीकरण नोंदणी, दवाखान्यातील बेडची उपलब्धता आदीबाबत जागृत राहून समाज हितार्थ जास्तीतजास्त मदत आणि योगदान देण्यासाठी भाजपायुमोच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रेरीत केले.

यावेळी मा.आ. संजय सावकारे, जिल्हाअध्यक्ष रजुमामा भोळे, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे शहराध्यक्ष परिक्षीत बऱ्हाटे युमो अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, उपाध्यक्ष अथर्व पांडे, राहुल मेहरानी, अमित असोदेकर, सरचिटणीस श्रेयस इंगळे, नंदकिशोर बडगुजर, चिटणीस विनीत हंबर्डिकर, निहाल लढे, सोनू सचदेव,सहसंयोजक वैद्यकीय आघाडी डॉ. जि.तू. पाटील, कायदा आघाडी शहराध्यक्ष अभिजित मेने, अनु.जाती. शहराध्यक्ष राहुल तायडे, ओविसी अध्यक्ष नरेंद्र बऱ्हाटे, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, राजेंद्र चौधरी, नगरसेवक, मनोज बियाणी, सतीश सपकाळे, गिरीश महाजन, सोशलमीडिया तालुका अध्यक्ष सागर जाधव आदी अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.